Tuesday, January 21, 2025

ग्रीनसेल मोबिलिटीने प्रयागराजमधील महाकुंभ मेलामध्‍ये लाखो भक्‍तांना परिवहन सेवा देण्‍यासाठी २०० इलेक्ट्रिक बसेस तैनात केल्‍या .


मुंबई, 21 जनवरी 2025 (ए पी एन):
ग्रीनसेल मोबिलिटी या भारतातील आघाडीच्‍या इलेक्ट्रिक मास मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स प्रदाता कंपनीने प्रयागराज येथे आयोजित करण्‍यात आलेला जगातील सर्वात मोठा आध्‍यात्मिक मेळावा 'महाकुंभ मेला २०२५'मध्‍ये भक्‍तांना परिवहन सेवा देण्‍यासाठी २०० इलेक्ट्रिक बसेस तैनात केल्‍याची घोषणा केली आहे. १३ जानेवारी २०२५ ते २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आयोजित करण्‍यात आलेल्‍या या भव्‍य मेळाव्‍यामध्‍ये जगभरातून ४०० दशलक्ष भक्‍त येण्‍याची अपेक्षा आहे.

महाकुंभ मेळाव्‍यादरम्‍यान २०० इलेक्ट्रिक बसेसच्‍या वापरामधून मोठ्या प्रमाणात सार्वजनिक परिवहन गरजांची पूर्तता करण्‍यामध्‍ये इलेक्ट्रिक परिवहनाची वाढती अनुकूलता आणि कार्यक्षमता दिसून येते. तसेच, यामधून शाश्‍वत व पर्यावरणपूरक परिवहन सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती ग्रीनसेल मोबिलिटीची अविरत कटिबद्धता देखील दिसून येते. हा उपक्रम महाकुंभ मेला २०२५ दरम्‍यान मोठ्या प्रमाणात कार्बन उत्‍सर्जन कमी करण्‍याची अपेक्षा आहे, तसेच शुद्ध, हरित वातावरण निर्माण करण्‍यासोबत या पवित्र मेळाव्‍याला उपस्थित राहणाऱ्या लाखो भक्‍तांना परिवहन सेवा देईल.

ग्रीनसेल मोबिलिटीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक (एमडी) व मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) देवेंद्र चावला म्‍हणाले, ''आम्‍हाला प्रयागराजमधील जगातील सर्वात मोठा व सर्वात पवित्र आध्‍यात्मिक मेळावा 'महाकुंभ मेला'प्रती योगदान देण्‍याचे सन्‍माननीय वाटत आहे. ग्रीनसेल मोबिलिटीमध्ये आमचा सार्वजनिक परिवहनामध्‍ये विनासायासपणे शाश्‍वततेचा समावेश करण्‍याचा दृष्टिकोन आहे. गतीशीलता वाढवण्‍यासोबत लाखो भक्‍तांना परिवहन सेवा देण्‍यासाठी २०० इलेक्ट्रिक बसेस तैनात करण्‍यात आल्‍या आहेत. यामधून शाश्‍वत भविष्‍य घडवण्‍याप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते. आम्‍हाला या पवित्र मेळाव्‍याला पाठिंबा देण्‍याचा आणि पर्यावरणदृष्‍ट्या जबाबदार सेलिब्रेशन करण्‍यामध्‍ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्‍याचा अभिमान वाटतो.''

या बसेस मेळाव्‍यादरम्‍यान हजारो टन टेलपाइप उत्‍सर्जनाला प्रतिबंध करण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यामधून इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील ग्रीनसेल मोबिलिटीचे नेतृत्‍व अधिक दृढ होत आहे. कंपनी भारतातील परिवहन क्षेत्रात हरित तंत्रज्ञानांचा समावेश करण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे, तसेच शुद्ध, उत्‍सर्जन-मुक्‍त वातावरण निर्माण करण्‍यावर लक्ष केंद्रित आहे.

No comments:

Post a Comment

Aditya Colleges Shimpoli Station: A New Chapter in Mumbai Metro

MUMBAI, 8 JULY, 2025 (APN/ JAGRUT BHANUSHALI):  In a landmark collaboration with the Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA...