श्रेणीमध्ये बसेस, ट्रक्स, कार्गो व लास्ट-माइल सोल्यूशन्सचा समावेश
मुंबई, 20 जानेवारी, 2025 (ए.पी.एन): - ईका मोबिलिटी या इलेक्ट्रिक वेईकल्स व तंत्रज्ञानामधील अग्रणी कंपनीने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये भारतातील इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या सर्वसमावेशक व सर्वात मोठ्या श्रेणीचे अनावरण करत भारताच्या शाश्वत परिवहन क्षेत्रात उल्लेखनीय बदल घडवून आणला आहे. हा भारताच्या शुद्ध गतीशीलतेच्या दिशेने प्रवासामधील मोठा टप्पा आहे, जेथे लॉजिस्टिक्स, शहरी गतीशीलता व सार्वजनिक परिवहन यामधील विविध व्यावसायिक परिवहन गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली लाइन-अप सादर करण्यात आली आहे.
ईका मोबिलिटीच्या नवीन इलेक्ट्रिक वेईकल श्रेणीमध्ये इलेक्ट्रिक बसेस, ट्रक्स आणि स्मॉल कमर्शियल वेईकल्स (एससीव्ही) यामधील ११ हून अधिक विशिष्ट प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे. ही वैविध्यपूर्ण लाइनअप सार्वजनिक परिवहन, लांब अंतरापर्यंतचे लॉजिस्टिक्स आणि लास्ट-माइल कनेक्टीव्हीटीमधील शाश्वत सोल्यूशन्ससाठी वाढत्या मागणीची पूर्तता करण्ययाकरिता धोरणात्मकरित्या विकसित करण्यात आली आहे. ईका मोबिलिटीने आपल्या इलेक्ट्रिक वेईकल श्रेणीला पूरक अत्याधुनिक ताफा व्यवस्थापन प्लॅटफॉर्म ईका कनेक्ट देखील लाँच केले आहे. ही सिस्टम रिअल-टाइम डेटा अॅनालिटिक्सचा फायदा घेत वेईकल कार्यक्षमता ऑप्टिमाइज करते, कार्यरत कार्यक्षमता वाढवते आणि व्यवसाय व परिवहन ऑपरेटर्ससाठी अधिकतम अपटाइमची खात्री देते.
ईका मोबिलिटीचे संस्थापक व अध्यक्ष श्री. सुधीर मेहता म्हणाले, ''ईका मोबिलिटीमध्ये आम्ही वेईकल्स डिझाइन करण्यासोबत शाश्वत गतीशीलता इकोस्टिम निर्माण करत आहोत. इलेक्ट्रिक बसेस, ट्रक्स व एससीव्हींच्या आमच्या नवीन श्रेणीमधून व्यवसाय आणि सार्वजनिक परिवहनासाठी नाविन्यपूर्ण, किफायतशीर व पर्यावरणपूरक सोल्यूशन्स वितरित करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. इलेक्ट्रिक गतीशीलतेप्रती परिवर्तनाचे नेतृत्व करत आमचा भारतातील हरित क्रांतीला गती देण्याचा आणि परिवहनाच्या भविष्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा मनसुबा आहे.''
ईका मोबिलिटी इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या भविष्याला गती देत आहे, तसेच जागतिक लीडर बनण्याचा दृष्टीकोन आहे. कंपनी स्मार्टर, सुरक्षित गतीशीलतेसाठी मॉड्युलर वेईकल प्लॅटफॉर्म्स, कार्बन-न्यूट्रल उत्पादन आणि प्रोप्रायटरी ईव्ही तंत्रज्ञानांवर लक्ष केंद्रित करते. प्रादेशिक इकोसिस्टम्स निर्माण करत, सरकार व उद्योगांसोबत सहयोग करत आणि टोटल कॉस्ट ऑफ ओनरशीप (टीसीओ) कमी करत ईका शाश्वत परिवहनाला आकार देत आहे. कंपनीच्या ईव्ही भारताच्या शाश्वतता ध्येयांप्रती मोठ्या प्रमाणात योगदान देतात, जेथे इंधन खर्चांमध्ये २०० कोटी रूपयांची बचत झाली आहे आणि दररोज १.७ कोटी प्रवाशांना फायदा होत आहे आणि ४.२ लाख टन कार्बन डायऑक्साईड कमी झाला आहे, जे २.३ कोटी झाडे लावण्याइतके आहे.
बस पोर्टफोलिओचा विस्तार: भारतातील इलेक्ट्रिक बसेसची सर्वात विस्तृत श्रेणी
ईका मोबिलिटीने विविध प्रवासी परिवहन गरजांसाठी डिझाइन करण्यात आलेल्या पाच इलेक्ट्रिक बस मॉडेल्स लाँच केले आहेत:
• ईका कोच - लांब अंतराच्या प्रवासासाठी भारतातील पहिली पूर्णत: स्टेनलेस-स्टील इलेक्ट्रिक लक्झरी बस टिकाऊपणा, सुरक्षितता व प्रीमियम आरामदायीपणा देते.
• ईका १२एम - एैसपैस इंटीरिअर्स, प्रगत सुरक्षितता वैशिष्ट्ये आणि उच्च दर्जाची कार्यक्षमता देणारी उच्च-क्षमतेची शहरी परिवहन बस.
• ईका ९एम - एर्गोनॉमिक सीटिंग, क्लायमेट कंट्रोल आणि अॅक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये असलली मध्यम आकाराची प्रवासी बस.
• ईका एलएफ (लो फ्लोअर) - सिटी बस शक्तिशाली इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेन आणिक कार्यक्षम डिझाइनसह अॅक्सेसिबिलिटी वाढवते.
• ईका ७एम - फिडर सर्विसेस, डोंगराळ प्रदेश आणि शहरातील अरूंद रस्त्यांसाठी डिझाइन करण्यात आलेली कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक बस.
लॉजिस्टिक्समध्ये क्रांतिकारी बदल: हेवी-ड्युटी व मिड-रेंज परिवहनासाठी इलेक्ट्रिक ट्रक्स
ईका मोबिलिटीने दोन शक्तिशाली मॉडेल्ससह इलेक्ट्रिक ट्रक सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे:
• ईका ५५टी - लांब अंतराच्या लॉजिस्टिक्ससाठी डिझाइन करण्यात आलेला २०० किमी रेंज, ४३,००० किग्रॅ पेलोड क्षमता असलेला प्युअर-इलेक्ट्रिक हेवी-ड्युटी ट्रक.
• ईका ७टी - शहरी लॉजिस्टिक्स व शहरांतर्गत कार्यसंचालनांसाठी २०० किमी रेंज, ३,५०० किग्रॅ पेलोड आणि सानुकूल कार्यक्षमता देणारा मिड-रेंज इलेक्ट्रिक ट्रक.
नवीन एससीव्ही श्रेणीसह लास्ट-माइल व शहरी गतीशीलतेचे सक्षमीकरण
एससीव्ही सेगमेंट विविध कार्गो व प्रवासी गतीशीलता गरजांची पूर्तता करणाऱ्या सहा वैविध्यपूर्ण इलेक्ट्रिक मॉडेल्ससह विस्तारण्यात आला आहे:
• ईका ३.५टी, २.५ टी आणि १.५टी - स्केलेबल इलेक्ट्रिक कार्गो वेईकल्स आंतरशहरीय व शहरी लॉजिस्टिक्ससाठी सानुकूल कन्फिग्युरेशन्स देतात.
• ईका ३डब्ल्यू कार्गो - शहरी वातावरणांमध्ये कार्यक्षम, शून्य-उत्सर्जन लास्ट-माइल डिलिव्हरीजसाठी डिझाइन करण्यात आलेली कॉम्पॅक्ट तीन-चाकी.
• ईका ६एस - लास्ट-माइल सार्वजनिक परिहवनासाठी शाश्वत, शेअर्ड मोबिलिटी सोल्यूशन, जे शहरांमधील कनेक्टीव्हीटी वाढवते.
• ईका ३एस - प्रवासी तीन-चाकी शहरी प्रवाशांसाठी पर्यावरणपूरक, किफायतशीर पर्याय देते.
No comments:
Post a Comment