Friday, June 21, 2024

बँक ऑफ बडोदा’च्या वतीने ब्रँड एंडोर्सर म्हणून उदयोन्मुख भारतीय टेनिस खेळाडू सुमीत नागल याची निवड


भारतीय खेळाडूंना स्वत:च्या क्षमतेचे संपूर्ण दर्शन घडविण्याकरिता लवकर मदत उपलब्ध करून देण्याच्या बँकेच्या नीतीमत्तेचा पुरस्कार

आजच्या तरुणांचा रोलमॉडेल, सुमीतचे बँकेला आगामी पिढ्यासोबत जोडण्यासाठी साह्य

मुंबई, 21 जून, 2024 (आशिया प्राइम समाचार): 
भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक, बँक ऑफ बडोदा (बँक)च्या वतीने उदयोन्मुख भारतीय टेनिस खेळाडू सुमीत नागल याला आपला ब्रँड एंडोर्सर म्हणून करारबद्ध केले आहे. जागतिक स्तरावर सर्वोत्तम खेळाडूंशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या उदयोन्मुख प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्याच्या बँकेच्या दीर्घकालीन तत्वज्ञानाच्या अनुषंगाने हे पाऊल उचलण्यात आले. 

सुमीत नागल या 26 वर्षीय खेळाडूची धोरणात्मक निवड तरुणाई आणि ग्राहकांच्या नवीन पिढीला लक्ष्य करण्यासाठी विशेषतः डिझाइन करण्यात आलेल्या उत्पादन श्रेणीसह करण्यात आली. 

सध्या भारतीय एकेरी टेनिस खेळात सुमीतने कारकिर्दीतील जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकात स्थान मिळविताना 17 जून 2024 रोजी #71 क्रमांक पटकावला. जानेवारी 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये ग्रँड स्लॅम पुरुष एकेरी सामन्यात मानांकित खेळाडूला पराभूत करणारा सुमीत हा मागील 35 वर्षांमधला पहिला भारतीय खेळाडू ठरला. 

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि युवा क्रिकेटपटू शेफाली वर्मा यांचा समावेश असलेल्या बँक ऑफ बडोद्याच्या एंडोर्सर यादीत सुमीत सामील झाला आहे.. 

या संघटनेबद्दल भाष्य करताना, बँक ऑफ बडोदा’चे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ देबदत्त चंद म्हणाले, "बँक ऑफ बडोदा’ला भारतातील काही सर्वात आशादायक क्रीडा प्रतिभांशी भागीदारी करण्याचा आणि त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पाठिंबा देण्याचा समृद्ध वारसा आहे. बँक ऑफ बडोदा कुटुंबात सुमीत नागलचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. टेनिस हा एक जागतिक, अत्यंत स्पर्धात्मक आणि मागणी असलेला खेळ आहे. यामुळे सुमीतचा प्रवास आणि त्याचे ईप्सित अधिक प्रेरणादायी आणि विलक्षण बनते. बँक ऑफ बडोदा, तसेच सुमीत यांच्यातील सहकार्य भारतात खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बँकेला तरुण प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल".

"सुमीतची बांधिलकी, चिकाटी, उत्कटता आणि प्रामाणिकपणा ही काही वैशिष्ट्ये आहेत. जी बँक तत्त्वज्ञानाला परिभाषित करतात; ही मूल्ये बँक ऑफ बडोद्यालाही प्रिय आहेत. 2024 हे वर्ष आधीच सुमीतसाठी एक महत्त्वपूर्ण वर्ष ठरले आहे आणि सुमारे 80,000 हून अधिक बडोदा कर्मचारी सुमीतचा जयजयकार करत आहेत. कारण तो आपली स्वप्ने साध्य करण्यासाठी आणि देशाला अभिमान वाटेल असा प्रयत्न करत आहे", असे चंद म्हणाले. 

सुमीत नागल म्हणाला, "बँक ऑफ बडोदा’शी भागीदारी हा माझा सन्मान आणि विशेषाधिकार आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो. बँक ऑफ बडोदा ही एक आघाडीची, विश्वासार्ह भारतीय वित्तीय सेवा संस्था आहे जी लाखो लोकांची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा बळकट करते आणि मी या सहकार्याची आतुरतेने वाट पाहत आहे.” 

दिनांक 16 ऑगस्ट 1997 रोजी जन्मलेल्या सुमीतने वयाच्या 8 व्या वर्षी टेनिस खेळण्यास सुरुवात केली. त्याने 2015 विम्बल्डन मुलांच्या दुहेरीचे विजेतेपद जिंकले. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये 3 वर्षांत ग्रँड स्लॅम एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये पोहोचणारा सुमीत हा पहिला भारतीय आहे. युरोपमध्ये 2 एटीपी चॅलेंजर एकेरी विजेतेपद जिंकणारा तो पहिला भारतीय आहे. अलीकडेच, एप्रिल 2024 मध्ये, सुमीत हा मोंटे कार्लो मास्टर्स स्पर्धेच्या मुख्य ड्रॉसाठी पात्र ठरणारा 49 वर्षांनंतरचा पहिला भारतीय खेळाडू ठरला. 64 व्या फेरीत माटेओ अर्नाल्डीला पराभूत करून मातीवर मास्टर्स 1000 सामना जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. 

================================================

No comments:

Post a Comment

Sidharth’s Solo Show by Aura Art at Jehangir Art Gallery (November 4-10, 2025)

MUMBAI, NOVEMBER 05, 2025 (APN/ JAGRUT BHANUSHALI 📞 09987355702 ):   Aura Art presents ‘ Fables of the Fabulous ’, a Solo Show of Painting...