मुंबई, 22 जून, 2024 (आशिया प्राइम समाचार)- जागतिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाने वेढलेल्या जगात आंतरराष्ट्रीय पातळीवर वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठीची पसंती वेगाने वाढत आहे. उद्योन्मुख डॉक्टर्स आता त्यांच्या मायदेशाच्या पलीकडे जात, दर्जेदार शिक्षण, वैविध्यपूर्ण वैद्यकीय अनुभव आणि वेगळ्या संस्कृतीमधील जीवनशैली अनुभवण्याच्या संधीकडे आकर्षित होत आहेत. यावरून उच्च शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर स्थलांतर तसेच विविध संस्कृतींमध्ये टिकून राहाण्याची क्षमता व कौशल्यांना प्रचंड महत्त्व देणारी आंतरराष्ट्रीयीकरणाची व्यापक चळवळ घडून येत असल्याचे दिसून येते.
परदेशी वैद्यकीय शिक्षणाची भुरळ
परदेशी वैद्यकीय शिक्षणाच्या असंख्य फायद्यांकडे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत. त्यातल्या प्रमुख फायद्यांमध्ये आधुनिक वैद्यकीय प्रशिक्षण उपलब्ध असणे, वैविध्यपूर्ण रुग्णांचा अनुभव घेता येणे आणि खूपदा हे शिक्षण भारतासारख्या त्यांच्या मायदेशातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत जास्त परवडणारे असणे यांचा समावेश होतो. वैद्यकीय क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची फिलिपाइन्स आणि जॉर्जियासारख्या ठिकाणांना पसंती लाभत आहे. दमदार शिक्षण यंत्रणा, जागतिक मान्यता असलेली पदवी आणि राहण्याचा व शिक्षणाचा तुलनेने कमी असलेला खर्च यांमुळे विद्यार्थ्यांचा या देशांकडे कल आहे.
परदेशी वैद्यकीय पदवीचा दर्जा आणि प्रतिष्ठा
विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबापुढे असलेली सर्वात महत्त्वाची चिंता म्हणजे, परदेशी वैद्यकीय पदवीचा दर्जा आणि प्रतिष्ठा. फिलिपाइन्ससारख्या देशातील प्रतिष्ठित संस्था अमेरिकी पद्धतीच्या वैद्यकीय शिक्षण यंत्रणेचे अनुकरण करतात. या यंत्रणा त्यांचा कठोर अभ्यासक्रम आणि विस्तृत वैद्यकीय प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहेत. त्याहीपेक्षा यातील बऱ्याच संस्थांना जागतिक आरोग्य संघटनेसारख्या (डब्ल्यूएचओ) जागतिक संघटनांची मान्यता लाभलेली आहे. शिवाय या संस्था वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मेडिकल स्कूलमध्ये नोंदणीकृत असल्यामुळे त्यांनी प्रदान केलेली पदवी वैध असतेच, शिवाय तिला आंतरराष्ट्रीय स्वीकृतीही मिळते. रशिया आणि युक्रेनसारखे देश दर्जेदार वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहेत, मात्र सध्या सुरू असलेल्या सामाजिक- राजकीय तणावांमुळे विद्यार्थी पर्यायांच्या शोधात आहेत. परिणामी, स्थिर वातावरण आणि समान शैक्षणिक दर्जा उपलब्ध करून देणाऱ्या इतर देशांमध्ये अर्ज करण्याचा कल लक्षणीय प्रमाणात वाढला आहे.
सांस्कृतिक आणि व्यावसायिक समृद्धी
परदेशात वैद्यकीय शिक्षण घेत असताना चांगल्या सांस्कृतिक आणि व्यावसायिक विकासाची संधी मिळते. विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण आरोग्यसेवा यंत्रणा आणि पद्धतींचा अनुभव मिळत असल्यामुळे त्यांचे वैद्यकीय ज्ञान तर वाढतेच, शिवाय परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमताही विस्तारते. परदेशात राहून शिक्षण घेण्यातून स्वावलंबन, चिकाटी आणि आंतर- सांस्कृतिक कौशल्यं वाढीस लागतात, जी आजच्या परस्परांशी जोडलेल्या जगात फार महत्त्वाची आहेत. या काळात तयार होणाऱ्या सांस्कृतिक कक्षा आणि मैत्री अमूल्य ठरतात आणि पर्यायानं विद्यार्थ्याचं वैयक्तिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध होतं.
जागतिक संधींचे प्रवेशद्वार
उद्योन्मुख आणि उत्तर अमेरिकेत प्रॅक्टिस करू इच्छिणाऱ्या डॉक्टर्ससाठी युनायटेड स्टेट्स मेडिकल लायसन्सिंग एक्झॅमिनेशनमध्ये (युएसएमएलई) यश मिळवणे आवश्यक असते. इंटरनॅशनल मेडिकल ग्रॅज्युएट्सनाही (आयएमजी) या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणे रेसिडेन्सी मिळवण्यासाठी आणि कालांतराने अमेरिकेत प्रॅक्टिस करण्यासाठी गरजेचे असते. किरगिझस्तान, रशिया, फिलिपाइन्स ही ठिकाणे आयएमजीसाठी जास्त योग्य समजली जातात, कारण युएसएमएलईमधील त्यांचे आतापर्यंतचे यश उल्लेखनीय आहे. तसेच हे पर्याय कमी किंमतीत उपलब्ध होतात.
फिलिपाइन मेडिकल स्कूल्सचे युएसएमएलई पासिंगचे प्रमाण सातत्यपूर्ण असून ते बऱ्याचदा जागतिक सरासरीपेक्षा जास्त असते. गेल्या काही वर्षात स्टेप 1, स्टेप 2 सीके (क्लिनिकल नॉलेज) आणि स्टेप 2 सीएस (क्लिनिकल स्किल्स) परीक्षा पास होण्याचा दर काही संस्थांमध्ये 90 टक्के आहे. अशाप्रकारची लक्षणीय कामगिरी फिलिपाइन्समधील वैद्यकीय शिक्षणाची विद्यार्थ्यांना कठोर लायसन्सिंग परीक्षांसाठी तयार करण्याची प्रभावी क्षमता दर्शवणारी आहे. त्याशिवाय पदवीधर विद्यार्थ्यांना अमेरिकेतील दमदार रेसिडेन्सिसी प्रोग्रॅमचाही फायदा होत असून ते सातत्याने त्यांच्या ज्ञानाचा लाभ घेतात. यावरून त्यांना फिलिपाइन मेडिकल स्कूल्सद्वारे दिले जाणारे शिक्षण आणि वैद्यकीय प्रशिक्षणाच्या दर्जावर विश्वास असल्याचे दिसून येते.
आव्हाने आणि पूरक यंत्रणा
विविध प्रकारचे लाभ असूनही विद्यार्थ्यांना स्थानिक संस्कृती आपलीशी करण्यात, भाषेच्या अडथळ्यावर मात करण्यास किंवा होमसिकनेस हाताळताना अडचणी येऊ शकतात. मात्र, कित्येक परदेशी विद्यापीठे विद्यार्थ्यांना आपल्या पूरक यंत्रणेद्वारे पाठिंबा देतात. त्यामध्ये भाषेचे प्रशिक्षण, कौन्सेलिंग सेवा आणि पीयर मेटॉरिंग प्रोग्रॅम यांचा समावेश असतो. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना तिथे रूळण्यासाठी आणि समृद्ध होण्यासाठी मदत मिळते. विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक शोध घेऊन अशाप्रकारचे सफाईदार स्थित्यंतर आणि यशस्वी शैक्षणिक प्रवासासाठी मदत करणाऱ्या संस्थांची निवड करावी.
फिलिपाइन फायदे
वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील आघाडीच्या ठिकाणांमध्ये फिलिपाइन्स तेथील वाजवीपणा, दर्जा आणि अमेरिकी मापदंडाप्रमाणे तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम आघाडीवर आहे. त्याशिवाय फिलिपाइन्सद्वारे अमेरिकेत रेसिडेन्सी प्रोग्रॅमचे बळकट नेटवर्क चालवले जाते. या प्रोग्रॅम्सतर्फे त्यांच्या मेडिकल स्कूल्समधून पदवीधरांची भरती केली जात असल्यामुळे उत्तर अमेरिकेत प्रॅक्टिस करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तो आकर्षक पर्याय ठरला आहे. फिलिपाइन्सद्वारे वाजवी, पैशांचे पूर्ण मूल्य देणारे शैक्षणिक पर्याय अमेरिका व कॅनडासारख्या देशांत येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत अतिशय कमी किंमतीत उपलब्ध करून देत या क्षेत्रात क्रांती आणली जात आहे. येथील वार्षिक शैक्षणिक शुल्क 2000 ते 5000 डॉलर्स असून त्याद्वारे जगभरातील महत्त्वाकांक्षी व्यावसायिकांसाठी आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य पर्याय उपलब्ध झाला आहे.
सारांश सांगायचा झाल्यास मायदेशात तीव्र स्पर्धा आणि खर्चिकपणासारख्या समस्यांना तोंड देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी परदेशातील वैद्यकीय शिक्षणाचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यात आव्हाने असली, तरी वाजवी शिक्षण, दर्जेदार प्रशिक्षण आणि जागतिक संधींमुळे हा पर्याया आकर्षक ठरत आहे. फिलिपाइन्स, जॉर्जिया आणि इतर असे देश आंतरराष्ट्रीय मापदंडाचे पालन करणारे आणि जगभरात प्रॅक्टिस करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दमदार वैद्यकीय शिक्षण पुरवण्यात आघाडी घेत आहेत. जग जास्तीत जास्त जवळ येत असताना परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्याचा ट्रेंड आता वाढतच जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि सक्षमपणे वैद्यकीय व्यवसायातील आव्हाने हाताळण्याचा क्रांतीकारी अनुभव घेणे शक्य होणार आहे.
प्रतिक्रिया
‘वाजवी आणि दर्जेदार शिक्षणाचे पर्याय उपलब्ध करत फिलिपाइन्स वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणत आहेत. 2000 ते 5000 डॉलर्स शैक्षणिक शुल्कासह या देशातर्फे जगभरातील महत्त्वाकांक्षी व्यावसायिकासाठी वास्तववादी मार्ग खुला करून दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय मापदंडाशी सुसंगत असा या देशातील दमदार अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना जागतिक प्रॅक्टिस करण्यासाठी सक्षम करतो. दमदार युएसएमएलई कामगिरी आणि अमेरिकेतील प्रतिष्ठित रेसिडेन्सी प्रोग्रॅम यांचा त्यांना पाठिंबा लाभला आहे. यामुळे फिलिपाइन्स मेडिकल स्कूल्स सर्वसमावेशक प्रशिक्षण, सांस्कृतिक समृद्धी आणि जागतिक स्तरावर वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्याचा मार्ग यांच्या शोधात असलेल्यांसाठी सर्वोत्तम पर्याय आहेत.’
No comments:
Post a Comment