Monday, September 29, 2025

भारतात धोरणात्मक विस्तारीकरण करत स्कॅन ग्लोबल लॉजिस्टिक्सने जागतिक अस्तित्व केले बळकट


मुंबई, 28 सप्टेंबर 2025 (APN): जागतिक पातळीवरील लॉजिस्टिक्स कौशल्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या स्कॅन ग्लोबल लॉजिस्टिक्सतर्फे (एसजीएल) भारतात पदार्पण केल्याचे घोषणा करण्यात आली असून यावरून धोरणात्मक वाढीसाठीची त्यांची बांधिलकी दिसून येते. हा महत्त्वाचा टप्पा गाठून एसजीएलचे भारतात थेट अस्तित्व निर्माण करण्याचे प्राधान्य दिसून येते आणि यावरून जागतिक पातळीवरील फ्रेट फॉरवर्डर म्हणून असलेले त्यांचे स्थान अधिक पक्के होते.

भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून तिच्या वार्षिक जीडीपी वाढीचा दर 6 ते 7 टक्के आहे. 2075 पर्यंत भारत दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरेल आणि त्याची क्रयशक्ती अमेरिकेपेक्षा 30 टक्क्यांनी जास्त असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जागतिक व्यापारातील भारताची भूमिका अधिक महत्त्वाची होत असलेल्या या काळात, वाढती परदेशी गुंतवणूक आणि कार्यक्षम, विश्वासार्ह लॉजिस्टिक्स सोल्यूशन्सची मागणी लक्षात घेता, एसजीएलकडून भारतातील विस्ताराचे पाऊल टाकण्यात आले आहे.

स्थानिक स्तरावर थेट उपस्थिती निर्माण करून, भारतात कार्यरत असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करणाऱ्या भारतीय कंपन्यांनाही सेवा देण्यासाठी एसजीएल विशेषतः सक्षम ठरते. भारतातील बदलत्या आर्थिक वाढीशी सुसंगत अशी सानुकूल सोल्यूशन्स देण्याची क्षमता एसजीएलकडे आहे.

भारतातील एसजीएलच्या नव्याने सुरू होणाऱ्या संचालनासाठी भक्कम पायाभरणी करण्यात आली असून, चेन्नई, दिल्ली आणि मुंबई येथे तीन कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. मुंबई हे मुख्य कार्यालय असेल. मर्स्क, सीईव्हीए लॉजिस्टिक्स आणि रेन्स लॉजिस्टिक्ससारख्या प्रतिष्ठित कंपन्यांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली स्थानिक टीम कार्यरत असेल.

स्कॅन ग्लोबल लॉजिस्टिक्सचे ग्लोबल सीईओ ॲलन मेलगार्ड म्हणाले, “भारतात अस्तित्व निर्माण करणे ही एसजीएलसाठी नेहमीच सर्वोच्च प्राधान्याची बाब होती. आम्हाला अशा टीमसोबत भारतात प्रवेश करायचा होता जी आमच्या उद्दिष्टांशी, ग्राहक प्रथम या दृष्टीकोनाशी आणि उद्योजकतेच्या भावनेशी सुसंगत असेल. हे साध्य झाल्याने भारतात आमची वाटचाल सुरू करण्यासाठी हे योग्यच वेळ आहे, याची आम्हाला खात्री आहे. आम्ही तीन महत्त्वाच्या शहरांमधून संचालन सुरू करत आहोत आणि लवकरच देशभर आमचा विस्तार करण्याची आमची महत्त्वाकांक्षी योजना आहे.”

स्कॅन ग्लोबल लॉजिस्टिक्स इंडियाचे सीईओ विकास अग्रवाल म्हणाले, “भारतामधील आमचे पदार्पण हे स्कॅन ग्लोबल लॉजिस्टिक्ससाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारत ही एक भरपूर संधी असलेली बाजारपेठ आहे. या ठिकाणी वेग, लवचिकता आणि विश्वासार्ह संबंध यांना खूप महत्त्व आहे. आम्ही अशा प्रकारे कंपनीची उभारणी करत आहोत की जी पूर्णपणे लवचिक आणि सक्षम असेल, ज्यामुळे आम्ही ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या गरजांनुसार झपाट्याने निर्णय घेऊ शकू आणि त्यांना योग्य सोल्यूशन्स वेळेवर देऊ शकू.”

जागतिक पातळीवरील विस्ताराची पुढची पायरी
एसजीएलचा भारतातील विस्तार हा त्यांच्या जागतिक पातळीवर वाढ करण्याच्या धोरणाचा नैसर्गिक पुढचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात, ब्राझीलमधील ब्लू ब्राझिल, इटलीमधील फोपियानी शिपिंग अ‍ॅण्ड लॉजिस्टिक्स आणि कॅनडामधील आयटीएन लॉजिस्टिक्स यासारख्या महत्त्वाच्या कंपन्यांचे अधिग्रहण करून एसजीएलने आपले अस्तित्व अधिक बळकट केले आहे.भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत, जिथे आंतरराष्ट्रीय ग्राहक मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करत आहेत आणि पुरवठा करत आहेत, अशा बाजारपेठेत संचालन सुरू करणे ही पुढची धोरणात्मक पायरी ठरते. स्थानिक पातळीवरील तज्ज्ञांची टीम आणि जागतिक पातळीवरील सेवा उपलब्ध करून देत एसजीएल इंडियातर्फे प्रोजेक्ट लॉजिस्टिक्स आणि ह्युमॅनिटेरियन लॉजिस्टिक्स यामधील विशेष कौशल्यांसह एक सुसंगत आणि सर्वसमावेशक सोल्यूशन्स पॅकेज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
===========================================================================================================================================

एनयूसीएफडीसी आणि सीएससी एसपीव्ही यांच्यात नागरी सहकारी बँकांच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी सामंजस्य करार


मुंबई, 29 सप्टेंबर 2025 (APN): भारतातील नागरी सहकारी बँकांची (UCBs) शिखर संस्था असलेल्या नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनयूसीएफडीसी) या क्षेत्राच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड (सीएसी एसपीव्ही) यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे.

नागरी सहकारी बँकांना सुरक्षित आणि नियमांचे पालन करणाऱ्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरने सक्षम करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आधार-आधारित ई-केवायसी, ई-साइन, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट्स, डिजिलॉकर इंटिग्रेशन, ई-स्टॅम्प सेवा, क्लाउड होस्टिंग, डेटा सेंटर व्यवस्थापन आणि सायबरसुरक्षा उपाययोजना यांचा समावेश असेल. पुढील टप्प्यांमध्ये इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग, किऑस्क-आधारित सेवा आणि डिजिटल कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म्स सुरू करण्यात येतील.

एनयूसीएफडीसी आपल्या सदस्य यूसीबींमध्ये या उपक्रमाचा स्वीकार सुलभ करेल, तर सीएससी एसपीव्ही प्लॅटफॉर्म्स, एपीआय आणि ऑपरेशनल सपोर्ट उपलब्ध करून देईल. अंमलबजावणी आणि क्षमता विकासावर देखरेख करण्यासाठी संयुक्त गव्हर्नन्स टीम काम करेल. करारामध्ये प्रशिक्षण, अनुपालन सहाय्य, तक्रार निवारण आणि डेटा संरक्षण उपाययोजनांचाही समावेश आहे. यूसीबींमधील संस्थात्मक प्रक्रिया अधिक मजबूत करण्यासाठी लागू असलेल्या नियामक नियमांशी सुसंगतता साधण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

हा सामंजस्य करार मुंबईत एनयूसीएफडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रभात चतुर्वेदी आणि सीएससी एसपीव्हीचे ग्रुप प्रेसिडेंट श्री. भगवान पाटील यांच्या उपस्थितीत औपचारिकरित्या करण्यात आला.

या भागीदारीबद्दल एनयूसीएफडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रभात चतुर्वेदी म्हणाले, “नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राने आपल्या पारंपरिक पायाभूत स्वरूपासोबत आता डिजिटल युगात झेप घेणे आवश्यक आहे. ही भागीदारी यूसीबींना भविष्यातील गरजांसाठी सज्ज असे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देते, ज्यामुळे त्या लाखो ग्राहकांना अधिक कार्यक्षमतेने, पारदर्शकतेने आणि नियमांचे पालन करून सेवा देऊ शकतील. आर्थिक समावेशन आणि विश्वास हे क्षेत्राच्या विकासाचे केंद्रबिंदू ठरत असताना ही भागीदारी यूसीबींना आधुनिकीकरण आणि आव्हानसक्षमतेच्या मार्गावर ठामपणे उभे करते.”

सीएससी एसपीव्हीचे ग्रुप प्रेसिडेंट श्री भगवान पाटील म्हणाले, “सीएससी एसपीव्हीची डिजिटल पायाभूत रचना आणि एनयूसीएफडीसीचा संस्थात्मक अधिकार एकत्र येऊन नागरी सहकारी बँकांच्या परिवर्तनासाठी एक बळकट तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म तयार करतात. आम्ही एकत्रितपणे अशा उपाययोजना देऊ ज्या व्यापक प्रमाणावर लागू करता येतील. या उपाययोजनांमुळे सहकारी बँकिंग क्षेत्र मजबूत होईल आणि लास्ट-माइल सिटिझन्ससना बँकिंग सेवांचा तितक्याच सोयीस्करपणे अनुभवता येतील. हा उपक्रम म्हणजे डिजिटल भारतासाठी शहरी सहकारी बँकिंगचे नव्याने कल्पनाचित्र रेखाटणे आहे.”

Wednesday, September 17, 2025

Grand Jain Sanghs Maha Rath Yatra to Grace South Mumbai on Sunday 21 September 2025


300+ Monks, 45 Floats and Thousands of Devotees will participate in the Maha Rath Yatra

MUMBAI, 17 SEPTEMBER, 2025 (APN): Under the supreme reign of Lord Mahavir, a grand chariot procession (Maha Rath Yatra) organized by Jain Sanghs who practice devotion strictly in accordance with Jain Agamas and Dharma scriptures, will take place on Sunday, 21st September, on the central roads of South Mumbai.
In the metropolitan city of Mumbai, this unique and exemplary Rath Yatra aims to establish the ideals of scriptural authenticity and righteous conduct (vidhimarg). The procession will commence at 8:30 AM from Chandanbala Jain Sangh, Walkeshwar, and it is expected to witness a massive turnout of devotees from across Maharashtra, Gujarat, Karnataka, and various areas of Mumbai.
The Rath Yatra, starting from Chandanbala–Shripalnagar–Malabar Hill, will sanctify key central roads of Mumbai as it passes through Chowpatty, Sukhsagar, Girgaon, Khetwadi, CP Tank, and will conclude at the Motisha Lalbaug Jain Temple in Bhuleshwar. Following the procession, a grand religious assembly (Dharma Sabha) will take place, during which revered Gurubhagwants will explain the spiritual significance of the Rath Yatra and share details of upcoming events. Thousands of fellow Jain devotees will participate in collective spiritual devotion.
This grand event is being organized by all Jain Sanghs and spiritual aspirants of Greater Mumbai, strictly adhering to the Jain Agamas and traditional scriptural practices. The Rath Yatra is a mark of Anumodna (rejoicing in others’ spiritual practices) of the austerities performed during Paryushan Mahaparva, and is considered a part of the annual spiritual duties of Jain householders (Shravaks).
The event will be graced by over 300+ revered monks and nuns, including some of the most respected Acharyas from the renowned Tapagacch sect, especially those associated with the community of Suriramchandra, and the lineages of Surishantichandra and Siddhisuriji Maharaj. Some of the prominent spiritual leaders participating are:
Param Pujya Acharya Devesh Shrimad Vijay Shreyansprabhasuriswarji Maharaj, a renowned orator and spiritual guide currently residing in South Mumbai for Chaturmas; Adhyatmasamrat Param Pujya Acharya Devesh Shrimad Vijay Yogtilaksuriswarji Maharaj;  Param Pujya Acharya Devesh Shrimad Vijay Harshsheelsuriswarji Maharaj, known for his melodious discourses; Param Pujya Acharya Devesh Shrimad Vijay Mokshratishuriswarji Maharaj, a poet at heart; Param Pujya Acharya Devesh Shrimad Vijay Hitratnasuriswarji Maharaj, and many other monks, scholars, and ascetics.
Thousands of Jain devotees will gather to chant the praises of the Jain order (Shasan). The procession will include: 5 Indra Dhwajas (flags); Over 45 floats from different Sanghs; 35+ initiates (Diksharthis); Depictions of Lord Neminath, Shripal-Mayna, 108 Parshwanath Tirth (Kondhwa, Pune);
Over 15 marching bands, Puneri Dhols, various rare Mandalis (spiritual performance groups);100+ volunteers holding inspiring spiritual quotes; Over 500 Pathshala children; 7 chariots representing 7 Tirthankaras, and much more.
One of the most notable highlights of this Rath Yatra, which justifies the title “Maha Rath Yatra” is its unwavering adherence to the fundamental principles and ideals of Jain Dharma, visibly upheld throughout the entire event.
Special Attraction This Year:-
Devoted youth dressed in ceremonial worship attire will carry palanquins of all 24 Tirthankaras (Jain Gods) on their shoulders — a sight to behold.

Sidharth’s Solo Show by Aura Art at Jehangir Art Gallery (November 4-10, 2025)

MUMBAI, NOVEMBER 05, 2025 (APN/ JAGRUT BHANUSHALI 📞 09987355702 ):   Aura Art presents ‘ Fables of the Fabulous ’, a Solo Show of Painting...